लांजा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लांजा तालुका संपर्क कार्यालयाचे लोकार्पण रविवार ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी शुक्रवारी लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या विभाजनानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. शिवसेना पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला पक्षाचे सचिव सुधीर साळवी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, माजी आमदार गणपत कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, लोकसभा महिला संघटक नेहा माने, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गीतेश राऊत, ओबीसी सेल जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, तसेच राजापूर संपर्कप्रमुख चंद्रकांत नकाशे, चिपळूण विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक सक्रे, विधानसभा संघटक रामचंद्र तथा तात्या सरवणकर, जिल्हा संघटक शिव सहकार चंद्रकांत शिंदे, युवा नेते अजित यशवंतराव, उपजिल्हा महिला संघटक उल्का विश्वासराव, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, माजी शहर प्रमुख नितीन शेट्ये यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लांजा तालुका शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, जिल्हा समन्वयक परवेज घारे, महिला तालुका संघटक पुर्वा मुळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 03/May/2025














