आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून लांजातील शाळांमध्ये संगणक वाटप

लांजा : आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील ८ शाळांना डिजिटल शैक्षणिक कामांसाठी संगणक संचाचे वाटप करण्यात आले. डिजिटल शैक्षणिक अंतर्गत आमदार निरंजन डावखरे यांनी विद्यार्थी व शाळांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शाळांना संगणक वाटप केले. यामध्ये लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल लांजा, तु. पु. शेट्ये ज्युनिअर कॉलेज, मराठी शाळा लांजा नं. १, मराठी शाळा कोट, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर हायस्कूल तळवडे, न्यू इंग्लिश स्कूल जावडे, वेरवली खुर्द, साडवली या शाळांना संगणक वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रत्नागिरी येथे पार पडला. यावेळी शिक्षक, संचालक तसेच पदवीधर समन्वयक अॅड. सुमंत वाघदरे, विजय कुरुप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 10/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image