रत्नागिरी : पावस परिसरातील गौतमी नदी आणि खाडीचे खारे पाणी शेत जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात घुसत आहे. पावस येथील तेली वाडी, काजीवाडा परिसरातील अनेक भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खारे पाणी जात असल्यामुळे जमिनी नापीक बनत चालल्या होता त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी सातत्याने केली जात होते.
अखेर त्याकरिता ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला त्या माध्यमातून गौतमी नदी व खाडीकिनारी धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना खाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळाला आहे. या बंधाऱ्यामुळे शेतजमिनीत घुसणारे खारे पाणी थांबणार असून शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 05/May/2025














