चिपळूण : बहादूरशेखनाका येथे उभारली प्रवासी शेड

चिपळूण : प्रवाशांची नियमित वर्दळ असलेल्या शहरातील बहादूरशेखनाका येथील प्रवासीशेडचा प्रश्न मार्गी लागला आहे. रोटरी क्लब यांच्या पुढाकाराने आणि आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यातून निवारा शेड उभारण्यात आली आहे. या शेडचे आमदार निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उन्हामध्ये तिष्ठत राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

चिपळूण बहादूरशेखनाका येथील निवारा शेडची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांची पावसाळ्यात व उन्हाळ्यात गैरसोय होत होती. त्यामुळे येथे निवारा शेड व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. खेर्डी येथील सीमाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी पालिकेकडे निवारा शेड उभारण्याची मागणीही केली होती. चिपळूण रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बाळा आंबुर्ले व सदस्यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. आमदारांच्या सहकायनि बहादूरशेखनाका येथे निवारा शेड उभारण्यात आली आहे.

या शेडच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सुभाष मोहिते, रोटरीचे माजी अध्यक्ष बाळा आंबुलें, माजी सेक्रेटरी शैलेश टाकळे, माजी खजिनदार राजेश ओतारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 10/Oct/2024