सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नायशी येथील एकता विकास मंडळ नायशी नारळेवाडीच्या वतीने ४० व्या सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या १० मे २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले जाईल.
एकता विकास मंडळ, अप्रांत हॉस्पिटल चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अप्रांत हॉस्पिटल चिपळूणचे तज्ञ डॉक्टर, डॉ. यतीन जाधव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पांडे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या तपासणी शिबिरात ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, हाडांचे विकार आणि दृष्टीदोष यांसारख्या विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, सामान्य आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध असेल.
उपसरपंच संदीप घाग आणि एकता विकास मंडळाने गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे:
सकाळी ९ ते दुपारी १: मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सायंकाळी ४ ते ५: सत्यनारायण महापूजा
सायंकाळी ७ ते ८: सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ असुर्डे यांचा हरिपाठ
रात्री ८ ते ९:३०: महाप्रसाद
रात्री १० ते १२:३०: स्थानिक भजन
या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य संदीप घाग, किशोर घाग, रमेश गं. घाग, अरविंद घाग, सदानंद घाग, उमेश घाग, सचिन मोरे, निखिल घाग, नितीन घाग, दत्ताराम गं. घाग, ऋत्विज घाग, सोहम मोरे, राकेश भा. घाग आणि हर्षल घाग विशेष परिश्रम घेत आहेत.
तरी, परिसरातील नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा आणि सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकता विकास मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 09/May/2025
