चिपळुणात अवकाळी पावसाची रिपरिप

चिपळूण : चिपळूण परिसरात काल (दि.९) सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत अवकाळी पावसाने रिपरिप लावली होती. दिवसभर आकाशात काळे ढग जमून पावसाची ही रिपरिप सुरूच होती. यामुळे अनेक रस्ते निसरडे झाले.

यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आता अवकाळी पाऊस देखील ठिकठिकाणी पडत आहे. उकाडा वाढल्याने नागरिकांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळत असला, तरी पाऊस गेल्यानंतर उकाड्यात वाढ होत आहे.

शहर परिसरासह खेर्डी भागात शुक्रवारी पावसाने रिपरिप लावली, त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून आंबा विक्रीसाठी आलेल्या लोकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी तातडीने प्लास्टीक कापड आणून त्यावर आवरण घातले. या पावसामुळे मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 10/May/2025