संगमेश्वर : हातीव येथे मॉक ड्रील ची रंगीत तालीम

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील ग्रामपंचायत, शाळा क्र. १ व हातीव मेढे वाणीवाडी येथे बुधवारी तालुका प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी ४ वा. ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रील) यशस्वीरित्या पार पडले.

युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी आपले संरक्षण कसे करावे? याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. या मॉकड्रील अंतर्गत देवरूख पोलिस ठाण्यातर्फे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव व १८ पोलिस अंमलदार यांनी सह्याद्रीनगर, मार्लेश्वर तिठा, देवरूख बसस्थानक या ठिकाणी प्रवाशांना व वाहनचालकांना हवाई हल्ला झाल्यावर युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सावधानता कशी बाळगावी व सुरक्षितस्थळी कसे जावे, याविषयी ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी बुधवारी मॉक ड्रील करण्याचे आदेश दिले होते. यानुसार संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे बुधवारी सायंकाळी ४ वा. तालुका प्रशासनाकडून मॉकड्रील करण्यात आले. या मॉक ड्रील अंतर्गत अचानक युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना आपले संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 10/May/2025