राजापूर : शिळ येथे १२ ते १४ मे दरम्यान ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

राजापूर : शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून या जिर्णोध्दारीत मंदिराचा उद्घाटन व नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवार दि. १२ ते बुधवार १४ में या कालावधीत शिळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिळ गावचे ग्रामदैवत व श्री नवलादेवीच्या जुन्या मंदिराचा नूतनीकरण करताना स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थ तसेच समाजातील दानशुर व्यक्तिंच्या आर्थिक योगदानातून नव्याने आरसीसी आराखडा बनवून सुंदर वास्तु साकारण्यात आली आहे. निसर्ग सानिध्यात वसलेल्या या मंदिराच्या निर्माणाने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

यानिमित्त सोमवार दि. १२ मे मिती वैशाख शुद्ध पौर्णिमा रोजी सकाळी १०.०० वाजता राजापूर जवाहरचौक ते श्री नवलादेवी मंदिर नूतन मूर्ती मिरवणुक काढली जाणार आहे. सायं. ८.०० वाजता वारकरी भजन (साळीस्ते कणकवली) तर रात्री ९.०० वाजता वारकरी भजन (सौंदळ पाजवेवाडी) सादर होणार आहे.

मंगळवार दि. १३ मे मिती वैशाख कृ. प्रतिपदा रोजी सकाळी ८.०० वा. प्रायश्चित्य, पुण्याहवाचन, वास्तुशांती होमहवन, मंडप देवता स्थापन, पूजन जलाधिवास, धान्याधीवास, शय्यावास दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद सायं. ७.०० वा. संगीत भजन (बुवा केदार कदम, उपळे) सादर होणार आहे. तर सायं. ८.०० वा. होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम रात्री ९.०० वा. लकी ड्रॉ सोडत काढली जाणार आहे.

बुधवार दि. १४ मे मिती वैशाख कृ. द्वितीया या दिवशी सकाळी ९.०० वाजता प. पू. गगनगिरी महाराज मठ कोंडीवळे चे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज यांचे हस्ते कळशारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वा. मुख्य देवता होम हवन, सर्व देवता स्थापन व प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, बलिदान, महाआरती, दुपारी २.०० वा. ३.०० महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ४.०० वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ६.०० वा. हरिपाठ भजन (वारकरी सांप्रदाय मंडळ शीळ) सायं. ७.०० वा. देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा, सायं. ९.०० पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद तर रात्री १०.०० वाजता समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे महाराष्ट्रात गाजलेले विनोदी लोकनाट्य सादर होणार आहे.

तरी भाविकांनी याप्रसंगी उपस्थीत राहुन दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिर नूतनीकरण समिती ग्रामिण / मुंबई व समस्त ग्रामस्थ मौजे शिळ यांचे वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 10/May/2025