आजची पिढी काय वाचते, यावर देशाचे उद्याचे भवितव्य : शिला केतकर

चिपळूण : वाचनामुळे आत्मपरिवर्तन घडते. आजची पिढी काय वाचत आहे, यावर देशाचे उद्याचे भवितव्य अवलंबून असते, असे प्रतिपादन पेढे येथील आर. सी. काळे विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका शिला केतकर यांनी केले. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहराचा केवळ भौगोलिक विकास, एवढाच विचार न करता साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून शहराला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे, असे त्या म्हणाल्या.

विचारांची व्यापकता वाचनातून मिळते, वाचनावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, यामुळेच चिपळूण नगर परिषदेने सुरू केलेला वाचू आनंदाने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे यावेळी व्याख्याते मंदार ओक यांनी सांगितले.

चिपळूण नगर परिषदेने दर रविवारी दोन तास निसर्गाच्या सानिध्यात वाचू आनंदाने, हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी खंड हवेली येथे हा उपक्रम झाला. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, शिला केतकर, मंदार ओक, श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सई वरवाटकर, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, कैसर देसाई, रंजिता ओतारी, सारिका भावे, प्राची जोशी, दीपक भाटिया, नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, बापू साडविलकर, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 12/May/2025