गुहागर : परप्रांतीयांच्या व फेरीवाले यांच्या नोंदी जानवळे ग्रामपंचायतीमध्ये कराव्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांनी जानवळे सरपंच जान्हवी विखारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी परप्रांतीयांचे नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात विविध क्षेत्रांत परप्रांतीय कार्यरत आहेत. त्या सर्वांची आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील त्यांचे आधारकार्ड पाहुन त्याचे फोटो काढून व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चाचपणी करून त्यांची आपल्या दप्तरी नोंद करण्यात यावी आणि हे परप्रांतीय मजूर कोणासाठी काम करतात ते कुठे राहतात, याचीही तपासणी करून त्याचीही नोंद ठेवावी. जेणेकरून संभाव्य गुन्हे टळू शकतील. तसेच फेरीवाल्यांना गावात फिरण्यास बंदी करण्यात यावी, असे गाव बंदीचे फलक लावण्यात यावे. येत्या १५ दिवसात या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर यांनी व्यक्त केली आहे.
उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी विजय शिंदे, सचिन कोळंबेकर, शुभम बैकर, साईराज वैकर, शैलेश आग्रे, हेमंत चिवेलकर, अमित कोळंबेकर यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 11/Oct/2024
