रत्नागिरी : राज्यातील कंत्राटदारांची थकित देयके त्वरित मिळावीत, तसेच अन्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने जिल्हाध्यक्ष सागर मांगले यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या अशा – महाराष्ट्र राज्यातील खुल्या गटातील छोटे-मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडील विकासकामे कंत्राटी तत्त्वावर पूर्ण केली असून त्या कामांची राज्यातील सर्व विभागांकडील कंत्राटदार व विकासकांनी केलेल्या विकासाच्या कामांची प्रलंबित ४० हजार कोटींची देयके तातडीने द्यावी. यापुढे सरकारी कामे १०० टक्के निधी मंजूर असल्याशिवाय मंजूर करू नयेत. राज्यातील सर्व विभागांकडील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, ओपन कंत्राटदार यांना शासन निर्णयानुसार ३३:३३:३४ या टक्केवारीने वाटप व्हावीत. तसेच ग्रामविकास विभागाची कामे ४०:२६:३४ या टक्केवारीच्या शासन निर्णयानुसारच व्हावीत. राज्यातील छोट्या कामांचे अजिबात एकत्रिकरण करू नये. मोठ्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढू नयेत,.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व न्याय दिला जावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 11-10-2024