खेड : कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांसह प्रवाशांचे मोबाईल चोरट्यास पेण पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. भगवान तुकाराम महाडिक (रा. कोलाड-रायगड) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने रेल्वेगाड्यांतील अन्य चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले होते. आसनांवर झोपलेल्या प्रवाशांच्या डोक्याखाली असलेले मोबाईलही चोरट्याकडून लांबवले जात होते. ठाणे, वडखळ, पेणदरम्यानही रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पेण पोलिसांनी चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी सापळा रचला होता. यात भगवान महाडिक याला रंगेहाथ पकडले. पेण व वडखळ स्थानकात घडलेल्या चोऱ्यांमध्ये याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या दृष्टीने पेण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 12/Oct/2024
