मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात चार दसरा विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि शिवसेना शिंदे गटाच्या दसऱ्या मेळावाच्या आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पॉडकॉस्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे, अशी टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंच्या पॉडकास्टवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी बेसावध न होता मतदान करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं. माध्यमांनी यावेळी यावरुनच संजय राऊत यांना सवाल विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.
“राज ठाकरे अगदी बरोबर बोलले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे दुर्दैवाने उभे राहिले होते. महाराष्ट्राची लूट दिल्लीते सत्ताधीश खास करुन मोदी आणि शाह करत आहेत. व्यापार मंडळाचे नेते. त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्यांनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 12-10-2024