दिव्यांगत्वावर मात करत ‘ऋणाली’ बनली संगणक प्रशिक्षक

साखरपा : अंगभूत कला असेल आणि मनात जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते. हे ऋणाली बडद हिने दाखवून दिले आहे. पूर्णपणे कर्णबधिर आणि मूकबधिर असलेली ऋणाती ही आज संगणक प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी आहे रत्नागिरीची ऋणाली ही जन्मापासून कर्णबधिर आणि मूकबधिर आहे. दहावीपर्यंत तिचं शिक्षण रत्नागिरीतत्याच मूकबधिर विद्यालयातून झाले. त्याच दरम्यान तिला चित्रकलेची आवड असत्याचे लक्षात घेऊन तिच्या पालकांना जाणवले, तिची आवड आणि कलाक्षेत्राकडे असलेला कल लक्षात घेऊन तिच्या वडिलांनी ऋणालीता पुण्याला चित्रकलेसा फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवले. तो अभ्यासक्रम ऋणालीने यशस्वीपणे पूर्ण केला त्यानंतर पुढे काप, हा प्रश्न उभा होताच त्याचवेळी तिला संगणकाचीही आवड आहे. हे लक्षात आहे. संगणक आधि कलाक्षेत्राकडे असतेता ओढा यांची सांगड घातून ग्राफिक अँड अॅनिमेशन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम कोल्हापूरला राहून पूर्ण केला. हे शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, ऋणातीला ऐकू घेत नसल्यामुळे शिकवत असलेला अभ्यास आत्मसात कसा करून घ्यायचा, हा प्रश्न तिच्यापुढेही होता आणि तिच्या शिक्षकांपुढेही होता: पण ऋणालीसारख्या जिद्दी आणि हुशार विद्यार्थिनीला शिकवण्याचे आव्हान शिक्षकांतीही स्वीकारले. सुरवातीला चार-सहा महिने अनेक अडचणी आल्या, पण नंतर हळूहळू सराव झाला आणि ऋणालीने तो अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. ऋणाली रत्नागिरी इथे ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करते.

तिने सुरुवातीला शिवम साळवी यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. रत्नागिरीतील अनेक सोने व्यावसायिकांच्या दुकानाच्या जाहिराती तिने स्वतः तयार करून दिल्या आहेत.

फ्रेमना मोठी मागणी
ऋपाली स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करत आहे. त्याचवरोबर ती केळीच्या वाळलेल्या सोपांपासून चित्राच्या फ्रेम तयार करते. घरात लावण्यासाठी फ्रेमना मोठी मागणी आहे. अशातूनच तिनेतपार केलेले गुरु ठाकूर यांच्या चित्राची फ्रेम आणि बच्चू कडू यांच्या फोटोवरून केलेली फ्रेम विशेष गाजली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 12/Oct/2024