रत्नागिरी : काल रात्री रत्नागिरी कोकण नगर येथे घडलेल्या घटनेनंतर दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काही समाजकंटक फायदा उठवण्यासाठी सोशल मीडिया वरून अफवा पसरवत आहेत. रत्नागिरी खबरदार च्या लोकप्रियतेचा आणि विश्वासार्हतेचा फायदा उठवत काहीजण रत्नागिरी खबरदार च्या नावाने चुकीची वृत्त सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा कोणत्याही वृत्तावर रत्नागिरी करांनी विश्वास ठेवू नये अशी नम्र विनंती आम्ही करत आहोत. रत्नागिरी खबरदार चे प्रसारित होणारे प्रत्येक वृत्त हे रत्नागिरी खबरदार च्या वेबसाईटवर प्रथम प्रसिद्ध होते. त्यानंतर हे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध करताना प्रत्येक बातमी खाली ती प्रसिद्ध झाल्याची वेळ आणि दिनांक लिहिलेला असतो. या सर्व गोष्टींची खात्री करूनच वाचकांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या वृत्तांवर विश्वास ठेवावा.
हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 12-10-2024
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰