राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

NCP SP Group MP Supriya Sule News: मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.

याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे. यातच आता राजकीय वर्तुळातूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे-उद्धवसेना युतीबाबत भाष्य केले.

पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मी त्याचे स्वागत करेन, माझ्याही मनात तेच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र तर आनंदच आहे. कोणत्याही दोन संघटना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर चांगलेच आहे. शेवटी तो त्यांचा विषय आहे. एका सशक्त लोकशाहीत कोणी कोणासोबत काम करायचे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का?

Happy journey marathi

राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार असतील, तर आम्ही का स्वागत करणार नाही? असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर, आता बघुया. महाष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील, तर मी अर्थातच त्याचे स्वागत करीन. एकत्र येणे हा एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कष्टाने कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे तो पक्ष बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली. परंतु, आज आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील, तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 07-06-2025