चिपळूणमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेतील मच्छी मार्केट दुकानाच्या मागील बाजूस, ओढ्याच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या कल्याण नावाच्या मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका व्यक्तीला जुगार चालवताना ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि, ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अशोक विठ्ठल मुंडे (वय ३०, पो.कॉ/२६७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खेर्डी, दातेवाडी येथील सुनिल बाळा दाते (वय ५६) हा व्यक्ती मच्छी मार्केट दुकानाच्या पाठीमागे ओढ्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय कल्याण नावाचा मटका जुगार चालवत होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळवत होता.

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, सुनिल दाते जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याकडून ९५० रुपये रोख रक्कम आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ९५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी, आरोपी सुनिल बाळा दाते विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदणी क्रमांक १३९/२०२५ असून, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Happy journey

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 12-06-2025