खेड : जेसीआय खेडतर्फे सॅल्यूट टू सायलेंट स्टार या उपक्रमांतर्गत कळंबणी रुग्णालयातील २६ परिचारिकांचा गौरव करण्यात आला. रुग्णसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती जेसीआयचे अध्यक्ष अमर दळवी यांनी दिले.
परिचारिकांच्या गौरव कार्यक्रमावेळी दळवी यांनी जेसीआयच्या कार्यपद्धतीची आणि या उपक्रमामागील उद्दिष्टांची माहिती दिली. तसेच समाजातील दुर्लक्षित; पण महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी माजी अध्यक्ष जेसी आनंद कोळेकर यांनी कोविड काळातील परिचारिकांच्या धाडसी व निःस्वार्थ सेवेस विशेषतः गौरव करण्यात आला. जेसीआय अलुमनी क्लबचे अध्यक्ष जेसी परमानंद बेंडखळे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कपिल कोळेकर यांनी तर उत्तम नियोजन कार्यक्रम प्रमुख जेसी डॉ. दिग्विजय पवार यांनी केले.
या वेळी माजी अध्यक्ष जेसी अमित कदम, जेसी दीपक नलावडे, उपाध्यक्ष जेसी रोहित ओतारी, जेसी दानिश पाटणे तसेच खजिनदार जेसी चैतन्य सकपाळ उपस्थित होते. रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी जेसीआय खेडचे आभार मानले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना व सभासदांसाठी अल्पोपहार व्यवस्था कार्यक्रम प्रमुख जेसी डॉ. दिग्विजय हे पवार यांनी केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 12/Jun/2025














