जयगड जांभारी फाटा परिसरात ट्रकला अचानक आग

रत्नागिरी : जयगड मधील जांभारीफाटा परिसरात सैतवडे ते खंडाळा रोडवर ट्रकने अचानक पेट घेतला. ११ जून रात्री ट्रकमध्ये आग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वेळेवर हस्तक्षेप करत त्यांनी आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळवला. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे संभाव्य धोका टळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 13/Jun/2025

Infigo eyecare