खेड मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी विविध कार्यक्रम

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ जून रोजी सकाळी ७.३० वाजता स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे अभिषेक, तर ८ वाजता शंकराच्या मंदिरात अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता कळंबणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप केले जाईल. १० वाजता मुंबई-गोवा महामार्गालगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर १०.३० वाजता खेड बसस्थानक परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजता अनुग्रह शाळा वेरळे येथे भेटवस्तू वाटप, दुपारी १२ वाजता खेड शिवाचा चौक येथे लाडू वाटप तसेच दुपारी १ वाजता स्वामी समर्थ महाराज मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन खेडचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 13/Jun/2025

Khabardar diwali fest