रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा राजापूरची नूतन कार्यकारणीची निवड बिनविरोध

राजापूर : राजापूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा राजापूरची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत नुतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध पार पडली. त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष चव्हाण, उपाध्यक्ष पदी प्रशांत कांबळी, सचिवपदी निशांत रायकर, महिला उपाध्यक्ष पदी श्रीम.निधी जोशी बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत कांबळी, महिला उपाध्यक्ष श्रीम.निधी जोशी, सचिव निशांत रायकर, सह सचिव प्रशांत डिगुळे, कोषाध्यक्षपदी प्रदीप जाधव तर सदस्य म्हणून राजेंद्रप्रसाद राऊत, अभिजित कोरे, मंगेश जाधव, विलास सोबण, पंकज कुबल, गोरक्ष शेलार, शैलेश हलम, शेखर कावतकर, श्रीम.सोनम साळवी श्रीम.शिल्पा मयेकर, हनिफ नाईक यांची तर सल्लागार म्हणून संदीप हांदे, अनिल पिठलेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 16-06-2025

Happy journey english