रत्नागिरी : साथीच्या आजाराने जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात साथीचे आजार पसरले आहे. साथीच्या आजारांमुळे सिव्हीलची ओपीडी हाऊसफुल्ल झाली असून दररोज रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात ही रुग्णांची गर्दी वाढली आहे.

पावसाला आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. दरम्यान, यंदाच्या वर्षी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. काहीअंशी उघडीप मिळाल्यामुळे जिल्ह्यात साथीचे आजार पसरले असून सिव्हीलबरोबरच खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढली आहे. लहान मुलांमध्ये थंडी, ताप, उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे डासांमुळे पसरणारे आजार वाढत आहेत. सर्दी-खोकला, हगवण, डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळ, कॉलरा, ताप, गोवर, कांजण्या, टायफॉईड हे साथीचे रोग आहेत.

लहान मुलांत तापाची साथ
ऐन पावसाळ्यात साथीचे आजार वाढत चालले आहेत. लहान मुलांमध्ये शहर, जिल्ह्यात तापाची साथ पसरली आहे. त्याचबरोबर सर्दी, खोकला, उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहानमुलांच्या दवाखान्यात ही मोठी गर्दी वाढत आहे.

हे करावे
पाणी उकळून गार केलेले पाणी प्यावे
फिल्टर केलेले पाणी प्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा
बाहेरचे खाणे टाळावे, शरबत, ज्यूस बाहेरचे घेऊ नये
लहान मुलांची नखे काढा, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा, न वाळलेले कपडे वापरू नका
आपल्या अवतीभोवती कुंड्यात, जुन्या वस्तूत, घरासमोर पाणी साचणे धोक्याचे, त्यामुळे डास वाढतात व आजार होतात व संसर्गजन्य आजार असेल तर इतरांशी संपर्क कमी करा.

Tata punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 27/Jun/2025