वंदे भारत एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची सोडण्याची मागणी

खेड : कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सद्यःस्थितीतील एक्स्प्रेसचे ८ डबे प्रवाशांसाठी अपुरे पडत आहेत. प्रवाशांची वाढीव डब्यांची मोठी मागणी असतानाही अजूनही रेल्वेबोर्ड उदासीन आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी, अशी विनंती कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वेबोर्डाला केली आहे.

आलिशान वंदे भारत एक्स्प्रेस कोकण मार्गावर सुरू झाल्यापासून सर्वच फेऱ्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. सद्यःस्थितीतील एक्स्प्रेस ८ डब्यांची धावत आहे. ८ डबे अपुरे पडत असल्याने एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्यासाठी यापूर्वीपास्तच आग्रह धरण्यात आला आहे; मात्र तरीही रेल्वेबोर्डाने सकारात्मक निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. मुंबईत पिटलाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला झाल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालवणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने ९ टक्के प्रवासी क्षमतेची परंपरा कायम राखली आहे. सद्यःस्थितीत धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 02/Jul/2025

Happy journey marathi