मीरा भाईंदरमधील मोर्चाचे पडसाद; खेडमध्ये मनसैनिकांचे आंदोलन

खेड : मीरा भाईंदर येथील मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मराठीच्या मुद्यावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारून आज पहाटे पोलिसांनी अचानक अटक केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसे नेते प्रकाश महाजन, वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, राज्यातील अमराठी भाषिकांची मते मिळवण्यासाठी मराठी लोकांवर सरकार दडपशाही करत आहे. या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राहणारे अन्य सर्व भाषिक इथले होऊन राहत आहेत. मात्र काही ठराविक बिहार, उत्तर प्रदेश आझमगड आदी भागातील लोक येथे येऊन राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अमराठी लोकांना चिथावणी देत असल्याचे मीरा भाईंदर येथे निघालेल्या अमराठी लोकांच्या मोर्चावरून सिद्ध झाले आहे.

मात्र अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मराठी माणूस पक्ष भेद बाहेर पडून एकवटतो हे अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर झालेल्या मोर्चातून सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 09/Jul/2025