रत्नागिरी विभागाचे एसटी अभियंता सुरेश मोहिते यांची कोल्हापूरला बदली

रत्नागिरी: राज्य परिवहन रत्नागिरी विभागाचे विभागीय अभियंता (स्थापत्य) सुरेश मोहिते यांची बदली कोल्हापूर एसटी विभागात झाली. त्यांच्या जागी रत्नागिरी विभागाचा पदभार बालाजी कांबळे यांनी घेतला आहे. ते छत्रपती संभाजीनगरहूनन रुजू झाले आहेत.

मोहिते यांनी १४ फेब्रुवारी २०२२ ला रत्नागिरी विभागाचा कार्यभार हाती घेतला होता. चिपळूण, लांजा, रत्नागिरी येथे पूर्णपणे बंद पडलेली कामे नव्याने सुरू करून पूर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पाली बस स्थानकाचे नवीन काम त्यांच्या सहभागामुळे पूर्ण झाले. रहाटाघर बस स्थानकाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. एमआयडीसी खात्याकडून अनेक कामे सुरू आहेत. त्याचाही पाठपुरावा त्यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 21-09-2024