चिपळूण-कऱ्हाड रेल्वेप्रश्नी लवकरच बैठक : खासदार सुनील तटकरे

चिपळूण : चिपळूण कऱ्हाड रेल्वेमार्गासंदर्भात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचे काम सरकार करत आहे. काही ठिकाणी नव्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे; तसेच सिंधुदुर्ग ते कोल्हापूर आणि चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेने जोडण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी नुकतेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नव्याने प्रस्ताव तयार करण्याची सूचना खासदार राणे यांना केली आहे.

त्यामुळे मागील 42 वर्षांपासून रखडलेला हा मार्ग फास्टट्रॅकवर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला कसा फायदा होईल, या संदर्भात प्रकाश टाकला. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मी दिल्लीमध्ये आहे. चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी प्रयत्नशील आहे. मीही या विषयावर रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेमंत्र्यांनी वेळ दिली आहे. या बैठकीत मी चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 29/Jul/2025

Shiva optical