चिपळूण : कामथेत माटे कुटुंबीयांतर्फे अन्नछत्राचा प्रारंभ

चिपळूण : लोकनेते स्व. बाळासाहेब माटे यांच्या दानशूरतेचा, निःस्वार्थ सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या सुपुत्रांनी पुढे नेला आहे. राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता वडिलांप्रमाणे समाजासाठी अविरत कार्य करणारे डॉ. विजय माटे हे खऱ्या अर्थाने ‘माटे’ कुटुंबाचा सामाजिक चेहरा आहेत, अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी डॉ. विजय माटे यांच्या कार्याचे कौतुक केले.

बाळासाहेब माटे सामाजिक प्रतिष्ठान संचलित (कै.) कुंदाताई स्मृती अन्नछत्राच्या प्रारंभाप्रसंगी आमदार निकम बोलत होते. विजय मेडिकलसमोर, शिवनदीशेजारी संपूर्ण श्रावण मासभर चालणाऱ्या या अन्नछत्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. स्व. बाळासाहेब माटे यांची लाडकी मुलगी कुंदाताई यांचे रुग्णांप्रती असलेले आपुलकीचे वर्तन, दररोज रुग्णांना दिला जाणारा घरगुती डबा या दानशूरतेचे स्मरण आजही चिपळूणकरांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या निधनानंतर स्व. बाळशेठ माटे यांनी श्रावण महिन्यात अन्नछत्र सुरू केले. त्यानंतर आता डॉ. विजय माटे या कार्याला पुढे नेत आहेत. डॉ. माटे म्हणाले, आबा व माई यांचे स्वप्न पूर्ण करणे हाच आमचा हेतू आहे. हे अन्नछत्र ही त्यांची आठवण जपणारी सामाजिक सेवा आहे. अन्नछत्र श्रावण महिन्यात सकाळी ११ ते १ या वेळेत सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, माजी अध्यक्ष सतीश खेडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, राणी महाडिक, खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री खताते, सूर्यकांत खेतले, दिलीप माटे, दादा खातू, मनोज जाधव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 29/Jul/2025

Physciobot