रत्नागिरी : रक्षाबंधननिमित्त सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस

रत्नागिरी : रक्षाबंधन सणानिमित्त जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी पाकिटाची किंमत १२ रुपये आहे.

भावा-बहिणीचे नाते अधिक दृढ करणारा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा वाढविणारा आणि त्यांच्या अतूट नात्याचे प्रतीक असणारा रक्षाबंधन सण येत्या ९ ऑगस्ट रोजी आहे. अनेक बहिणींना प्रत्यक्ष जाऊन भावाच्या हातावर राखी बांधून सण साजरा करणे शक्य नसते. अशावेळी डाक विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये २३ हजार विशेष रंगीत राखी पाकिटे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पाकिटातून राखी देशात विदेशात कुठेही पाठवता येईल. पाकिटातून राख्या भाऊरायापर्यंत रक्षाबंधनाच्या आधी पोहोच करण्यासाठी राख्यांच्या पोस्ट ऑफिस बॅगेला वेगळे लेबल लावले जाणार आहे. वेळेत राख्या पोहोच करण्यासाठी त्यामुळे टपालाचे वर्गीकरण करताना राखी टपालाला प्राधान्य देण्यात येणार आहे.या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 29-07-2025

Hotel waiter