रत्नागिरी : जिल्हा न्यायालयात ‘सेक्स ट्रॅफिकिंग’ विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी ‘सेक्स ट्रॅफिकिंग’ या अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम नुकताच जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने ARZ संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. सुनील श्रीधर गोसावी (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून –

डॉ. रूपेश पाटकर, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ, सिंधुदुर्ग, मा. न्यायमूर्ती श्रीमती सयोनारा टेलेस लाड (निवृत्त), माजी सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण व माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोवा श्री. अरुण पांडे, संस्थापक व संचालक, ARZ (NGO) यांची उपस्थिती लाभली.

Tata tiago

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

कार्यक्रमात विविध सेवाप्रदाते व असुरक्षित गटांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सेक्स ट्रॅफिकिंगच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर उपाययोजना, मदत केंद्रांची भूमिका, मानसिक आरोग्य व पुनर्वसन यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 30-07-2025