रत्नागिरी : अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागासाठी आवाहन

रत्नागिरी : केंद्रीय सिव्हिल सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्लीतर्फे आयोजित केलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत शासनातर्फे सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी अर्ज व्यवस्थापक सचिवालय जिमखाना, मुंबई ४०००३२ येथे टपालाद्वारे, प्रत्यक्ष किंवा पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं. जड-१५, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, वास्केटबॉल, कॅरम, बुध्दीबळ, जलतरण, अॅथलेटिक्स, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, कबड्डी, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो खो, योगा सत्र, संगीत, नृत्य व लघुनाट्य इत्यादी क्रीडा व कला प्रकारांत खेळाडू कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल आवेदनपत्र भरुन ते कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगावू प्रतीसह पाठवावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 30/Jul/2025

Ratnagiri Khabardar add image