रत्नागिरी : मद्याच्या नशेत प्यायला विषारी औषध; प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : मद्याच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या नेपाळी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मनोज थापा (४५, रा. गोळप, रत्नागिरी, मूळ नेपाळ) असे या प्रौढाचे नाव आहे.

ही घटना गुरुवार २४ जुलैला दुपारी घडली होती. मनोज थापाने मद्याच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवार २९ जुलै रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 30/Jul/2025

Mahrashi karve ANM