रत्नागिरी : खेड तालुक्यातील दस्तुरी ते वेताळवाडी मार्गावर खड्डे काँक्रिटचा वापर करून तसेच दापोली ते साखरोलीदरम्यान लांबीतील रस्त्यावरील खड्डे खडी व ग्रीटचा वापर करून भरण्यात येत आहेत. खेड पालिका क्षेत्रातील खड्डे जरा वाहतूक वर्दळीमुळे दिवसा भरणे शक्य नसल्याने रात्री काँक्रिट किंवा डांबर इमल्शनचा वापर करून भरण्याचे नियोजन केले आहे. रस्त्याची संपूर्ण लांबी खड्डेमुक्त करून रस्ता वाहतुकीस सुरळीत ठेवण्याबाबत ठेकेदाराला वेळोवेळी कळवण्यात आल्याची माहिती चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ज. ई. सुखदेवे यांनी दिली.
दापोली-वाकवली साखरोली खेड भरणे रस्त्यावर हायब्रीड अॅन्युटीअंतर्गत सुधारणा करण्याचे काम काळकाईदेवी रोड या ठेकेदारामार्फत प्रगतीत आहे. या रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावर पावसाळ्यात पडलेले खड्डे भरण्याचे काम ठेकेदारामार्फत हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर दस्तुरीफाटा ते वेताळवाडी आणि डेंटल कॉलेज-खेड नगरपालिका ते भरणेनाका या टप्प्यात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. हे खड्डे सुरुवातीला खडी व ग्रीटचा वापर करून वारंवार भरण्यात आले आहेत. खेड शहरातील खड्डे भरण्यासाठी रेडमिक्स काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे; परंतु पालिका हद्दीतील वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे भरलेले खड्डे भक्कम होण्यास पुरेसा अवधी मिळत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 12/Aug/2025












