चिपळूण बाजारपेठ गणेशोत्सवासाठी सजू लागल्या

चिपळूण : तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, दरड, पूर यांचा परिणाम गणेशोत्सवावर होतो. यंदा पाऊसच कमी असल्यामुळे अशा घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे. गणेशोत्सवापूर्वी चिपळूण तालुक्यात उत्साही वातावरण असून, बाजारपेठा सजू लागल्या आहेत.

चिपळूण तालुक्यात सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत २८०० मिलिमीटर पाऊस झाला आहे; मात्र एकदाही पूर आलेला नाही. पाऊस समाधानकारक पडत आहे. यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचा प्रकार यावेळी झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आवडणाऱ्या शोभेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीला आणल्या आहेत.

चिपळूणची बाजारपेठ जिल्ह्यात सर्वांत मोठी समजली जाते. येथे खेड, गुहागर, दापोली, संगमेश्वर तालुक्यांतील ग्राहक बाजारपेठेत चिपळूणमध्ये सर्व प्रकारचे घाऊक आणि किरकोळ व्यापारी आहेत. यंदा भारतीय बनावटीचे साहित्य बाजारात दाखल झाले असून, पर्यावरणपूरक सजावटीवर अनेकांचा भर असणार आहे. गणेशोत्सवात हार, फुले यांना मोठी मागणी असल्याने ते देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले

मॉन्सूनमध्ये सर्वाधिक दुर्घटना जिल्ह्यात घडत असतात. लोकजीवनावरही त्याचे पडसाद पडत असतात. पाच वर्षांच्या सरासरीप्रमाणे यंदा मात्र आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची स्थिती निर्माण झाली नाही. पाऊसदेखील समाधानकारक आहे. – शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 15/Aug/2025