Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्याला २ सप्टेंबरपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’

रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी संततधार तर कुठे मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री पावसाने जोर धरल्यानंतर सकाळी हलका पाऊस झाला. दुपारी बारानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. सूर्यनारायणाने दर्शन दिले होते. रविवारी एकूण २१५.३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याला २ सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात ४४.७५ मि.मी., लांजा २८.४० मि.मी., तर सर्वात कमी मंडणगडात ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मागील चार दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरूच आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कोकणवासीयांना बाहेर पडता येत नसल्यामुळे गणेशभक्तांचे हाल होत आहेत. रविवारी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर दुपारी काहीशी विश्रांती घेतली होती. रात्री पुन्हा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंडणगडात ४ मि.मी, खेड २१.७१, दापोली १८.८५ मि. मी., चिपळूण २६.५६ मि.मी., गुहागर २४ मि.मी, संगमेश्वर २७.५३ मि.मी, रत्नागिरी १९.५५ मि.मी., लांजा २८.४० मि.मी., राजापूर ४४.७५ मि.मी. इतका पाऊस झाला असून, सरासरी २३.९२ तर एकूण २१५.३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 01-Sep-2025