रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीर माता/वीर पिता / यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचे दौरे आयोजित केले आहेत. दौऱ्यावेळी अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर नोंदणी तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. चिपळूण तालुक्यामध्ये ४ व १९ सप्टेंबर रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे दौरा होणार आहे.
६ सप्टेंबर रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे दौरा आयोजित केला आहे. खेड तालुक्यात ८ व १५ सप्टेंबर, २३ व २९ सप्टेंबर रोजी सैनिक मुलांचे वसतिगृह खेड येथे दौरा असून संघटक सुनिल कदम यांना संपर्क साधावा. मंडणगड तालुक्यात ९ सप्टेंबर रोजी भोसले प्लाझा येथे दौरा असून कल्याण संघटक सुनिल कदम (९४१३५४१५८८) यांना संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 04/Sep/2025












