Ratnagiri : नेवरे येथे तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून दुभत्या गायीचा मृत्यू

रत्नागिरी : नेवरे येथील महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारेचा शेतात चरणाऱ्या गायीला शॉक लागला. यामध्ये दुभत्या गायीचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५ वा. सुमारास घडली.

नेवरे गावातील शेतकरी रघुनाथ गुरव हे जनावरे चरविण्यासाठी घेऊन जात होते. सोमवारी सकाळी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा चालू स्थितीत असताना त्यांच्या गाईला स्पर्श झाला. त्यांच्या डोळ्यासमोर दुभती गाय गतप्राण झाली. यावेळी गाईला बांधलेली दोरी ही त्यांच्या मुलगा विनायक यांच्या हातात होती. तर रघुनाथ यांच्या जवळ बैलाची दोरी होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून विनायक मात्र वाचला. या घटनेची माहिती मिळातच घटनास्थळी महावितरण कंपनीचे कर्मचारी, तलाठी, सरपंच, पोलिस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलिस उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 17/Sep/2025