विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील अग्रलेख नियमित वाचावा : माधव अंकलगे

रत्नागिरी : मराठी भाषा दोन हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील अग्रलेख नियमित वाचावा, असे मार्गदर्शन व्याख्याते माधव अंकलगे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते. “अभिजात मराठी भाषा” विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला, त्यासाठी कोणते निकष मराठी भाषेला पार करावे लागले, याबाबत माहिती दिली. विद्यार्थीनी कोणकोणत्या पुस्तकाचे वाचन करावे याबाबत विवेचन केले.

यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्री. अंकलगे यांनी केले. हे ग्रंथप्रदर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. कमळाबाई इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केली. मुख्य लिपिक सुधाकर वाघ यांनी आभार प्रदर्शन यांनी केले. विजय आंब्रे यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 09/Oct/2025