Mandangad : मुंडे महाविद्यालयात ‘भारतीय संविधान’ यावर मार्गदर्शन

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच ‘भारतीय संविधान व आजचा तरुण वर्ग’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादर येथील अनुलोम सामाजिक संस्थेचे माणगाव-रायगड विभागप्रमुख मा. श्री. रमेश डेबे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी अनुलोम संस्थेचे दापोली येथील भाग जनसेवक श्री. वेदांत शितुत, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. महादेव वाघ, प्रा. साई पवार, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला व प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली.

मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. रमेश डेबे यांनी सांगितले की, संविधान हे भारतीय लोकशाहीचा कणा आहे. हे संविधान म्हणजे कायदयांचा एक संच असून जो कोणत्याही राष्ट्राचे सरकार कसे चालवायचे याचे मार्गदर्शन करते. हा एक मूलभूत नियम आणि तत्वांचा एक दस्तऐवज आहे. जे सरकारची रचना, कार्यपध्दती, अधिकार आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्ये निश्चित करते. यामध्ये सर्वोच्छ कायदा, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, कायदेशीर दस्तऐवज, लोकशाही मार्गाने देश चालविण्याचे महत्वपूर्ण संविधान आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय सर्वधिान आहे तर या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय संविधान हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी हमी देते.

प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये संविधान म्हणजे एक भारतीय लोकषाहीची आदर्शवत कायदेशीर दस्तएवेज आहे. यामध्ये सर्व भारतीय घटकांना सामावून घेतलेले आहे. खरोखरच सदर संस्था ही एक सामाजिक विचार घेवून चालत असून अशा प्रकारचे उपक्रम हे निश्चितच समाजाच्या हितासाठी उपयुक्त असेच आहेत. संविधान आणि लोकशाही वर आपण मांडलेले विचार आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही असे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 09/Oct/2025