Rajapur : खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

पाचल : येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी या रॅलीस हिरवा ध्वज दाखवून रॅली मार्गस्थ केली. विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

या रॅलीत विद्यार्थ्यांनी ११ हजार रुपयाची मदत संकलित केली. या रॅलीत डॉ. विकास पाटील, प्रा. एस. व्ही. निंबाळकर, डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. एस. एस. धोंगडे, प्रा. एस. जी. चव्हाण, प्रा. पी. पी. राठोड, प्रा. एन. जी. देवण सहभागी झाले होते. संस्था अध्यक्ष मनोहर खापणे, सरचिटणीस नरेश पाचलकर यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 09/Oct/2025