खेड : खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू.ए.सी. अंतर्गत इतर पाच वरिष्ठ महाविद्यालयांशी सामंजस्य करार करण्यात आला. यात ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे, बोरज, डी. जी. तटकरे महाविद्यालय, माणगाव, सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाटपन्हाळे, तुकाराम बाबुराव कदम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भरणे या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
कार्यशाळा, चर्चासत्रे आणि विविध विद्यार्थी संबंधित क्लबशी उपक्रमांसह अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी वरील सर्व महाविद्यालयांनी एकत्र येत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये एकत्रितपणे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत या उपक्रमांमध्ये सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या करारामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच इतर कला, क्रीडा, कौशल्य यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या कराराचा लाभ सर्वच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री मंगेशभाई बुटाला, आय. सी.एस. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले यांनी व्यक्त केला. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना आय. सी. एस. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच प्रतिनिधी आणि आय.सी.एस. महाविद्यालयाच्या आय. क्यू.ए.सी चे समन्वयक प्रो. डॉ. ए. एम. शेख तसेच महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. डी. एम. शिंदे हे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 09/Oct/2025














