चिपळूण : प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस अंतर्गत उपकेंद्र डेरवण येथील डेरवण-खुर्द सुतारवाडी शाळेत नुकताच कॅन्सर प्रतिबंध लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सर्व शाळांमधील ९ ते १४ वयोगटातील मुलींना हा डोस दिला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या या लसीकरणावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूसच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजल बेलवलकर यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासह अन्य कारणांसाठी ही लस महत्वाची असल्याचे मार्गदर्शन केले.
तालुक्यातील सर्व शासकीय, खासगी शाळांमधील वरील वयोगटाच्या सर्व मुलींना लसीकरण होणार असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, ग्राम विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, ग्राम पंचायत प्रशासक शर्मिला नार्वेकर व ग्रामविकास अधिकारी ओंकार शिंदे, देवेंद्र राजेशिर्के, प्रकाश कानसे, मिलिंद जाधव, पोलीस पाटील सरिता मेस्त्री, डेरवण संजय मेस्त्री, आरोग्य सेवक नारायण शिंगवा, आरोग्य सहाय्यक सुमित गमरे, विजय गोरीवले, आरोग्य सहाय्यिका आकांक्षा कोळवणकर, मंदा जाधव, डेरवण उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आकाश पावसे, प्रतिभा पवार, गौरव सपकाळे, वैष्णवी चव्हाण, स्नेहा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 13/Oct/2025














