मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली आहे?
सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येईल. अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
आतापर्यंत दोन हप्ते आले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत. या दोन हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले आहेत. सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात रक्षबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आले होते. तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते. आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 23-09-2024