गावतळे : कार्तिकी एकादशीसाठी दापोली तालुक्यातील गावतळे परिसरातील ४० गावांतून खासगी व एसटी बस मिळून २५ गाड्या पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. गावतळे परिसरात स्व. यशवंत भगवंत पवार यांनी ८० च्या दशकात पंढरपूर वारी सुरू केली तेव्हा एकच गाडी जात होती. आता परिसरात वारकरी संप्रदाय विशाल झाला असून, दोन्ही वारीसाठी मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे गाड्या जातात. काही गाड्या गावतळे येथून, काही फणसू, पन्हाळेकाजी, करंजाळी, देगाव, टेटवली येथून सुटतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 31/Oct/2025














