Tulsi Vivah : जिल्ह्यात तुळशी विवाह उत्साहात

राजापूर : हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व असून, कार्तिकी द्वादशीला घरोघरी तुळशी विवाह संपन्न झाले. काल सायंकाळी धुमधडाक्यात मंगलाष्टके म्हणत भाविकांनी तुळशीविवाह कार्य पार पाडले. या निमित्ताने वाडीवस्तीवरील ग्रामस्थ एकवटले होते. या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

तुळशी विवाहाच्यावेळी ऊस धार्मिकदृष्ट्या शुभ मानला जात असल्याने तुळशीविवाहामध्ये ऊसाचा मंडपासाठी वापर केला जातो. त्यामधून बाजारपेठेत हजारो रुपयांची ऊसविक्री झाली. श्री विष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. हिंदू धर्मात रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने साजरा केला जातो. घरासमोरील तुळशी वृंदावन स्वच्छ आणि सुशोभित करण्यात आले होते. तुळशी वृंदावनासमोर काढण्यात आलेल्या आकर्षित रांगोळीने या सुशोभीकरणाला वेगळा साज मिळाला होता. त्यानंतर, यजमानांकडून उपस्थितांना अक्षता वाटून रीतसर लग्नविधी करून मंगलाष्टके म्हणत तुळशी विवाह संपन्न झाला. यावेळी सनईचौघडे वाजवून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

उसाला मागणी
तुळशी विवाहासाठी आवळे, चिंच या फळांसह मंडप सजावटीसाठी उसाचा वापर केला जातो. त्यामुळे उसाला दर अधिक होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 04/Nov/2025