रत्नागिरी : सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा हप्ताही लवकरच जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांच्याच खात्यावर रक्कम जमा होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने वारंवार आवाहन करून सद्धा २ लाख २१ हजार ८३० शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही. त्यामुळे त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात आले होते की फार्मर आयडी काढून घ्या; अन्यथा अनुदानापासून वंचित रहाल. जिल्ह्यात एकूण ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकरी असून त्यापैकी २ लाख ६६ हजार १०६ शेतऱ्यांनी अॅप्रिस्टँकमध्ये नोंदणी केलेली आहे. अद्याप २ लाख २१ हजार ८३० शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही.
त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान झालेले भात पीकसह इतर फळपिकांची नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्यांना नव्याने आयडी काढण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच केल्या होत्या. फार्मर आयडी तयार नसल्यास लाभार्थी यादीमध्ये नाव जाणार नाही. तोपर्यंत संबंधितांना अनुदानाची वाटच पहावी लागणार आहे.
कित्येक शेतकऱ्यांकडे नाही अॅग्रिस्टॅक क्रमांक
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, अॅग्रिस्टॅक आयडी असेल तर कोणत्याही प्रकारची ई-केवायसीची गरज नसून अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. त्यांना अनुदान, नुकसान भरपाई मिळणार नाही, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी सीएससी सेंटरमध्ये जाऊन अॅग्रिस्टॅक नंबर काढून घेणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 05/Nov/2025













