रत्नागिरी: नाट्य परिषद शाखेतर्फे आज मराठी रंगभूमी दिन

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे बुधवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता मारूती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर मराठी रंगभूमी दिन साजरा होणार आहे.

रंगभूमीदिनाच्या या कार्यक्रमात नटराज पूजन, नाट्यवाचन केले जाणार आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे साधेपणाने शाखेच्या कार्यालयात साजरा होणार आहे. रंगकर्मींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 05-11-2025

Tata tiago