रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील कोकण रेल्वेच्या टीव्हीसीआरच्या डीजे रुमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या रेल्वे पोलिसांनी ४८ तासांत मुसक्या आवळल्या. चोरीचा हा प्रयत्न शनिवार १२.३० ते १ वा. कालावधीत झाला होता.
रफिक महंमद खान (२९, रा. साळवीस्टॉप, रत्नागिरी) आणि साहिल संजय जाधव (२९, रा. पोलिस लाईन, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शनिवारी दुपारी या दोन्ही संशयितांनी करबुडे येथील टीव्हीसीआर (टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रूम) च्या डिजे रूमच्या शटरचे कुलूप तोडले. त्यानंतर अनधिकृतपणे त्यारुममध्ये प्रवेश करत सीसीटीव्ही केबल तोडली आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून ४८ तासांच्या आत या दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 05/Nov/2025














