Pawas : पावस परिसरातील ५० हेक्टर क्षेत्रावरील भातशेती पावसामुळे बाधित

पावस : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची रिपरिप अद्यापही सुरू असल्यामुळे पावस मंडल कार्यालयांतर्गत गावांमध्ये आत्तापर्यंत ५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून तालुक्यामध्ये अडीचशे ते तीनशे हेक्टर भातशेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पंचनाम्यांना सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी भिजून गेलेले भात गवतापासून वेगळे केले जात आहे.

पावस परिसरामध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये भात कापणी केल्यानंतर सुमारे ८० टक्के कापणी पूर्णत्वास गेल्यानंतर पावसाने सुरुवात केल्यामुळे हातात तोंडाशी आलेले भाताचे पीक जमीनदोस्त झाले आहे. अनेक ठिकाणी खाचरामध्ये पाणी असल्यामुळे काही ठिकाणी भात रुजून येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामेना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पावस मंडळ कार्यालयांतर्गत गावांमध्ये आतापर्यंत ४० ते ४५ हेक्टर भात क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचा अहवाल तयार केला जात आहे.

यात प्रामुख्याने गावखडी गावांमध्ये पाणथळ जागेमध्ये भात क्षेत्र असल्याने या परिसरामध्ये वीस ते पंचवीस हेक्टरमध्ये शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या परिसरामध्ये प्रत्येक गावांमध्ये कृषी विभागातर्फे पंचनामे केले जात आहेत व त्यानुसार बाधित क्षेत्राचा अहवाल तयार केला जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल. सध्या परिसरामध्ये पावसाची रिपरिप अजूनही सुरू असून काही शेतकरी भिजलेले भात कापून ते काही प्रमाणात सुकवून भात झोडणी करत आहेत, जेणेकरून भात पेंड्याचा उपयोग झाला नाही तरी निदान काहीप्रमाणात भाताचे दाणे हाती येतील या दृष्टिकोनातून पावसाच्या विश्रांतीमध्ये हे काम केले जात आहे सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये पावस परिसरामध्ये १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

त्यावर शेतकरी काम करीत आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल त्यामध्ये समाधान मानून कामात मग्न नाहीत यासंदर्भात निरूळ येथील शेतकरी निलेश ठीक म्हणाले की, सध्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत, परंतु जे काही भात कापून शेतामध्ये भिजत पडले आहे ते वाळवून त्यातील काही प्रमाणात भाताचे दाणे उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर या संदर्भात कृषी सहायक दीपक काळे म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये तालुक्यामध्ये अडीचशे तीनशे हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावस मंडल कार्यालयांतर्गत गावांमध्ये ४० ते ४५ हेक्टरमध्ये भात शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 05/Nov/2025