रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, शहरातील मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. ३१ ऑक्टोबरला पालिकेने ६४ हजार ७४० मतदाराची अंतिम यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यामध्ये सुमारे १ हजार ९०० दुबार मतदार आहेत. मतदार यादीवर दुबार म्हणून शेरा मारला आहे. त्यांची नावे नोटीस बोर्डवर जाहीर केली जाणार आहेत. त्यांच्याकडून कुठे मतदान करणार, हे लिहून घेतले जाणार आहे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास मतदान करताना त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती. यामध्ये सुमारे ७४ हजारांच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ५०० मतदारांवर हरकती दाखल झाल्या. पालिकेने स्थळ पाहणी करून हरकती निकाली काढल्या. तशी मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यास सांगितली आहे. साडेतीनशे मतदारांवर आक्षेप असून, त्यांना पालिकेने बाजू मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या.
त्याची प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी होऊन हरकती निकाली काढण्यात आल्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करून ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही अंतिम यादी ६४ हजार ७४० मतदाराची आहे. पालिकेने हरकतींचा अभ्यास करून अनेक ठिकाणी स्थळपाहणी केली. त्यानुसार यादीमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या. आता साडेतीनशे मतदारांवर हरकती घेण्यात आल्या होत्या.
या यादीमध्ये १ हजार ९०० दुबार मतदार आहे. त्यांच्यावर शेरा मारण्यात आला आहे. नोटीस बोर्डवर त्यांची नावे प्रसिद्ध केली बाणार असून, कुठे मतदान करणार हे लिहून घेतले जाणार आहे. त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे तसेच ६ हजार ६९९ मतदारांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पालिकेने दिलेला मतदानाचा पर्याय ३ हजार २२५ मतदारांना मान्य असून, ३ हजार ४७४ मतदारांना अमान्य आहे. अशा अनेक उपाययोजना करून पालिका प्रशासनाने अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 05/Nov/2025














