राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडीमुळे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील झाडी त्वरित तोडण्यात यावीत, अशी मागणी दोनिवडे येथील सहयोग प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजापूर पूल ते रेल्वेस्टेशन मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत, झाडांच्या फांद्या या वाढलेल्या आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहन चालकांची वाहन चालवताना अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे तारांबळ उडत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास किंवा कुणालाही दुखापत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील, असे त्या नमूद केले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडी त्वरित न तोडल्यास उन्हाळे, दोनिवडे, पांगरे, शेंबवणे, ससाळे, सोल्ये, आंगलेतील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात दिला आहे. यावेळी अध्यक्ष अनंत गुरव, विष्णू शिरवडकर, प्रवीण तोरस्कर, संजय पवार अमित पडवळ आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 05/Nov/2025














